Home >> देश -परदेश >> महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न, छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही

महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न, छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही

पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
47 mins ago
महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न, छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही

पाटणा : महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न करणे आणि तिच्या छातीला स्पर्श करून दाबणे ही कृत्ये गंभीर असली, तरी ती बलात्काराचा प्रयत्न (Attempt to Rape) ठरत नाहीत, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारची कृत्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४ अंतर्गत महिलेच्या शीलभंगाच्या गुन्ह्याच्या कक्षेत येतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती पूर्णेंदू सिंह यांनी हिमांशू कुमार पाठक उर्फ मिथिया पाठक याची २०१३ मधील दोषसिद्धी रद्द करत त्याची निर्दोष मुक्तता केली. यापूर्वी बंका येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या प्रयत्नाचा आणि बेकायदेशीर डांबून ठेवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवत तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.  (Attempting to remove a woman’s salwar and pressing her chest does “not unequivocally establish” an attempt to rape, the Patna High Court has held while setting aside the conviction of a man accused of attempting to sexually assault a client inside his photography studio.)

काय होती घटना?

सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, १९ जानेवारी २००८ रोजी पीडित महिला आपल्या वडिलांसोबत अमरपूर येथील 'छाया स्टुडिओ'मध्ये फोटो काढण्यासाठी गेली होती.  संशयिताने फोटो संगणकावर दाखवण्याचे कारण सांगून महिलेच्या वडिलांना बाहेर थांबवले. त्यानंतर स्टुडिओचा दरवाजा बंद करून महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न केला, स्वतःचे कपडे काढले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होता. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, मात्र आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.

न्यायालयाचे निरीक्षण

उच्च न्यायालयाने नमूद केले की, तपास पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्याची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय पुरावेही सादर करण्यात आले नव्हते.

न्यायालयाने स्पष्ट केले की,  बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी प्रवेशाचा (penetration) किंवा त्यासाठी स्पष्ट आणि ठोस प्रयत्नाचा पुरावा आवश्यक असतो. या प्रकरणात तसा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही.

तथापि, आरोपीने महिलेला बंदीस्त करून तिची सलवार काढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या छातीला स्पर्श करून शीलभंग करणारी कृत्ये केली असल्यास, ती भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत महिलेच्या शीलभंगाचा गुन्हा ठरू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा