गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; डंपरवर आदळली कार

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. (Three members of a family were killed after their speeding car rammed into a dumper from behind on the Mumbai-Goa Highway near Lanja in Maharashtra's Ratnagiri district). मृतांमध्ये दोन महिलांचा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हे कुटुंब गोव्यातून मुंबईकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार समोरून जात असलेल्या डंपरच्या मागील बाजूस जोरात धडकली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली.