Home >> देश -परदेश >> काशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

काशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
काशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

रत्नागिरी: कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील  वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. (Landslide at Kashedi Ghat on the Mumbai-Goa Highway in Raigad district पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी हद्दीत मोठ्या प्रमाणावर माती व दगड रस्त्यावर आल्याने कोकण ते मुंबई मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.

घटनेनंतर पोलीस,  प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले. तोपर्यंत मुंबई ते गोवा मार्गावरील लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू ठेवण्यात आली आहे. 

सावधगिरीने वाहने हाकण्याचे आवाहन 

प्रशासनाने वाहनचालकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने  वाहने चालविण्याचे आवाहन केले असून, महामार्गावरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.