अभिषेक शर्माची दुसऱ्या स्थानी घसरण

दुबई : आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताच्याच ईशान किशनने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने आपला सहकारी अभिषेक शर्मा याला मागे टाकत हे मानाचे स्थान मिळवले. वर्ष २०२६ मधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ईशान किशन आता जगातील नंबर १ टी-२० फलंदाज बनला आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यात बेलफास्ट येथे नुकतीच दोन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. या मालिकेनंतर ईशान किशनने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांची कमाई करत अभिषेकला मागे टाकले. या मालिकेत आयर्लंडने भारतीय संघाचा २-० असा व्हाईटवॉश केला असला, तरी न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि त्यानंतर झालेल्या टी-२० विश्वचषकापासून ईशान किशनने केलेल्या धावांच्या जोरावर त्याला या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
ईशान किशनच्या या यशामागे त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कारणीभूत ठरली आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात त्याने जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने ३१७ धावा कुटल्या होत्या. यामध्ये कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 'प्लेअर ऑफ द मॅच' कामगिरीचाही समावेश आहे.
दुसरीकडे, अभिषेक शर्माने जवळपास १२ महिने टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान राखले होते, मात्र आता ईशानने त्याची जागा घेतली आहे. या अव्वल स्थानासह ईशान किशन आता विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तो चौथा भारतीय पुरुष फलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराह पुन्हा नंबर १ कसोटी गोलंदाज
जागतिक क्रिकेटमध्ये नुकत्याच पार पडलेल्या तीन कसोटी सामन्यांनंतर कसोटी क्रमवारीतही मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
यापूर्वी न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने बुमराहसह संयुक्तपणे अव्वल स्थान गाठले होते. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ११ बळी घेणाऱ्या हेन्रीला पायाच्या दुखापतीमुळे पुढील दोन सामन्यांना मुकावे लागले, ज्याचा फटका त्याला क्रमवारीत सोसावा लागला.
ज्यो रूटचे अव्वल स्थान घसरले
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्रेंट ब्रिज कसोटीत हॅरी ब्रूक आणि जो रूट अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने जगातील नंबर १ कसोटी फलंदाजाचे स्थान काबीज केले आहे. ज्याे रूट दोन स्थानांच्या घसरणीसह आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
चॅम्पियनशिपमधीलआपली स्थिती मजबूत केली. या सामन्यातील कामगिरीमुळे न्यूझीलंडच्या चार फलंदाजांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. यामध्ये रचिन रवींद्र (दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या), डॅरिल मिचेल (पाच स्थानांच्या सुधारणेसह ११ व्या), डेव्हन कॉनवे (१४ स्थानांच्या झेपसह संयुक्त १५ व्या) आणि टॉम लॅथम (१२ स्थानांच्या सुधारणेसह संयुक्त ३१ व्या) यांचा समावेश आहे.