Home >> गुन्हे >> ८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक

८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक

सासष्टी तालुक्यातील नुवे परिसरातील घटना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 mins ago
८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक

मडगाव : सासष्टी तालुक्यातील नुवे परिसरात ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून संशयित स्टॅनली कुतिन्हो याला अटक करण्यात आली.

नुवे परिसरातील एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना ७ जुलै रोजी घडली होती. संशयिताने पीडित महिलेच्या दुकानात बेकायदेशीर प्रवेश करत तिचा विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

मायना कुडतरी पोलिसांनी तक्रार आल्यानंतर त्यांनी चौकशीअंती सराईत गुन्हेगार असलेल्या स्टॅनली कुतिन्हो याच्या विरोधात बेकायदेशीरपणे प्रवेश करणे, बळजबरी करणे, लैंगिक अत्याचार अशा कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. स्टॅनली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात म्हापसा पोलीस ठाण्यात ९ वर्षीय पीडितेवरील अत्याचारप्रकरणी पॉस्को कलमाखाली तर वेर्णा पोलीस ठाण्यातही दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा नोंद आहे. घटनेनंतर संशयित पसार होता. मायना कुडतरी पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी आता संशयित स्टॅनली कुतिन्हो याला अटक केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा