राम चोर्लेकर अध्यक्ष; बाळा केरकर सचिव

पणजी : कदंबा कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत राम चोर्लेकर यांची अध्यक्षपदी, बोम्बी बांदोडकर यांची उपाध्यक्षपदी, बाळा केरकर यांची सचिवपदी, तर निलेश काजारी यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत संचालक मंडळ तसेच पदाधिकाऱ्यांचे कदंबा वाहतूक समुहातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. नव्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.