Home >> देश -परदेश >> मध्यप्रदेश: शिंदे घराण्याची ४०० वर्षांपूर्वीची ३.५ टनांची ऐतिहासिक तोफ चोरीला

मध्यप्रदेश: शिंदे घराण्याची ४०० वर्षांपूर्वीची ३.५ टनांची ऐतिहासिक तोफ चोरीला

नरवर किल्ल्यातून चोरी; प्राचीन वस्तूंच्या तस्करांचा सहभाग असल्याचा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
55 mins ago
मध्यप्रदेश: शिंदे घराण्याची ४०० वर्षांपूर्वीची ३.५ टनांची ऐतिहासिक तोफ चोरीला

शिवपुरी : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून तब्बल ४०० वर्षे जुनी आणि सुमारे ३.५ टन वजनाची ऐतिहासिक तोफ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (A 400 year old cannon, weighing nearly 3.5 tonnes, was stolen from the historic Narwar Fort in Madhya Pradesh’s Shivpuri district)  चोरीला गेलेली तोफ शिंदे घराण्याशी संबंधित आहे. राज्यातील मौल्यवान वारसा मानल्या जाणाऱ्या या तोफेची चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

ही तोफ नरवर किल्ल्यातील 'ओपन कचेरी' परिसरात प्रदर्शित करण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, १५ ते १६ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही तोफ किल्ल्यातून हटवून वाहनाच्या साहाय्याने पळवून नेली.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी ५ जुलै रोजीही तोफ चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी तोफ तिच्या मूळ जागेवरून खाली ढकलली; मात्र प्रचंड वजनामुळे ती वाहून नेण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा नियोजन करून १५ जुलैच्या रात्री वाहनासह येत तोफ उचलून फरार झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणामागे प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंच्या अवैध तस्करीत सक्रिय असलेल्या संघटित टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे. किल्ला परिसरातील पुरावे, वाहनांच्या हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा