
विठ्ठला मागती तुझी साथ
धरिली पंढरीची वाट
पाहे वाट पंढरपुरी
मागती विठ्ठलाची साथ
पंढरपुरी चालली वारी
रुक्मिणी पाहे सखुची वाट
वारी पोहोचली तुक्याच्या दारी
तुका म्हणे त्यास पंढरीनाथ
पंढरीनाथ पाहे वाट
रुसली रखुमाई, हसले नाथ
पाप धुतले चंद्रभागेत
पापी केले चंद्रेच्या पाण्यास
भरले जंतू पसरे रोग
रुसले विठ्ठल पंढरपुरी
पंढरीची वारी परते घरी
तुका घरी जेवले वारकरी
केली भाजी कडू भोपळ्याची
तुका म्हणे त्यास नको करू राग
नाही झाला गोड चंद्रेत बुडवून.
पाप ज्याचे त्यास ,
करुनी सेवा मोजिले पुण्य
ना मिळे त्रास भक्तांच्या वाटी
बघतो विठ्ठल धरुनी कटेवरी हाती
विठ्ठल राया मागती तुझी साथ.
- सिया गावडे
गोवा विद्यापीठ