दुचाकी जळाल्याने दीड लाखांचे नुकसान

काणकोण : गुळे येथील विशांत भिकरो वेळीप यांनी गुळे येथे उभी करून ठेवलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतली.
दुचाकीतून धूर व आग निघत असल्याचे तेथील उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पाणी टाकून आग आटोक्यात आणली. या घटनेत सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दुचाकीचे नुकसान झाल्याची माहिती दुचाकी मालक विशांत वेळीप यांनी दिली.