मडगावात बँकेच्या एसी युनिटला आग; मोठी दुर्घटना टळली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th May, 11:40 pm
मडगावात बँकेच्या एसी युनिटला आग; मोठी दुर्घटना टळली

मडगाव : येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एसी युनिटला अचानक आग लागण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मडगाव अग्निशामक दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण आणले. वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

मडगाव पालिकेच्या मागील बाजूला असलेल्या इमारतीमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा असून या बँकेच्या इमारतीच्या परिसरात बसवण्यात आलेल्या एसी युनिटला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे काही काळ इमारतीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. शुक्रवारी दुपारी बँकेच्या बाहेरील एसी युनिटच्या मशीनमधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. आग पाहून बँकेतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली. बँक कर्मचार्‍यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. वीज खात्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी वीज पुरवठा खंडित केला.

मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टाळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, आग लागल्यानंतर एसी युनिटच्या कॉम्प्रेसरमधून गॅसची गळती होत होती. काही काळानंतर गॅस निघून गेल्यानंतर ही गळती थांबली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता आहे. 

हेही वाचा