१७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून मारहाण; ६० वर्षीय संशयिताला अटक

पैशांचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचाही आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18 mins ago
१७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून मारहाण; ६० वर्षीय संशयिताला अटक

पणजी : येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला पैशाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणी पणजी पोलिसांनी ६० वर्षीय संशयिताला अटक केली.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मंगळवार, दि. १२ रोजी सायंकाळी ७.४० वा. दरम्यान तक्रारदाराच्या १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला संशयिताने मारहाण केली. तसेच तिला पैशाचे आमिष दाखवून आपल्या बरोबर येण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद केले. याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी संशयित ज्येष्ठ नागरिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला पोलीस कोठडीसाठी गुरुवारी मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

हेही वाचा