
पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर कार्यक्रम जोमाने करून संघटन बळकट करा; असा सल्ला भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी प्रदेश अध्यक्ष दामू नाईक आणि इतर नेत्यांना दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. भेटीनंतर प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी ही माहिती दिली.
संघटन मजबूत करण्यासहीत संघटनात्मक कार्याविषयी आमची चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच माझ्याकडून त्यांनी पक्ष कार्याविषयी माहिती जाणून घेतली, असे दामू नाईक यांनी सांगितले. मंत्रिपदाविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला.
संघटना मजबूत करण्यासहीत कार्यकर्त्यांबरोबरचा संपर्क वाढवण्याच्यादृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून दिली आहे.
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ही राष्ट्रीय अध्यक्षांकडे झालेली पहिलीच भेट आहे.