चिकन पतियाळा रेसिपी

Story: चमचमीत रविवार |
11th April, 11:05 pm
चिकन पतियाळा रेसिपी

साहित्य: 

पाऊण किलो चिकन, अर्धा कप दही, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मिरे पूड, मीठ, तेल, दालचिनी, हिरवी वेलची, लवंगा, जिरे, बारीक चिरलेले आले आणि लसूण, चार मध्यम चिरलेले कांदे, दोन चिरलेले टोमॅटो, धणे पूड, हिरव्या मिरच्या, एक कप बारीक चिरलेली मेथी, एक मध्यम चिरलेला कांदा आणि एक सिमला मिरची (चौकोनी तुकडे), अर्धा कप काजू पेस्ट, जिरे पूड, गरम मसाला, आल्याचे काप, कसुरी मेथी, फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर.

कृती:  

प्रथम एका भांड्यात चिकन घेऊन त्यात दही, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मिरे पूड आणि मीठ घालून चांगले एकत्र करून मॅरीनेट करायला ठेवा. त्यानंतर कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करून त्यात दालचिनी, वेलची, लवंग आणि जिरे टाका, मग चिरलेले आले-लसूण आणि कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता. त्यात हळद, तिखट, धणे पूड आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा आणि यातील अर्धा मसाला एका वाटीत बाजूला काढून ठेवा. आता कढईतील उरलेल्या मसाल्यात मॅरीनेट केलेले चिकन आणि हिरव्या मिरच्या घालून चिकन पूर्ण शिजवून घ्या. दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात जिरे, आले-लसूण, मेथी, चौकोनी चिरलेला कांदा आणि सिमला मिरची घालून परता, मग त्यात बाजूला काढून ठेवलेला अर्धा मसाला, काजू पेस्ट, जिरे पूड, धणे पूड, हळद, तिखट आणि मीठ घालून थोडा वेळ शिजवून घ्या. ही तयार झालेली ग्रेव्ही शिजलेल्या चिकनमध्ये ओता आणि त्यात गरम मसाला, हिरवी मिरची, आल्याचे काप आणि कसुरी मेथी टाकून दोन मिनिटे वाफ काढा. शेवटी गॅस बंद करून वरून फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून गरमागरम चिकन पतियाळा सर्व्ह करा.


- शिल्पा रामचंद्र , मांद्रे