बाणावलीत घरात घुसून चाकू दाखवून डॉक्टरला लुटले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 mins ago
बाणावलीत घरात घुसून चाकू दाखवून डॉक्टरला लुटले

मडगाव : बाणावली येथील एका डॉक्टरच्या घरात घुसून चोराने चाकूचा धाक दाखवून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लुटला. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.

घरात घुसून धमकावून लुटण्याची ही घटना ६ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मडगावातील एका डॉक्टरचा बंगला बाणावली परिसरात असून याठिकाणी हा प्रकार घडला. डॉक्टराच्या बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोराने घरात प्रवेश केला. त्याने चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांच्या गळ्यातील सोनसाखळी, पाकीट यासह घराच्या व कारच्याही चाव्या घेऊन पोबारा केला. चोराने सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पळवून नेला. या घटनेनंतर कोलवा पोलिसांना माहिती देण्यात आली. तक्रारदारांनी संशयिताचे वर्णन पोलिसांना सांगितले असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कोलवा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल खाजनेकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा