काँक्रिट मशीनमध्ये लपवून मद्य वाहतूक; अनमोड येथे कारवाई

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
29th March, 11:05 pm
काँक्रिट मशीनमध्ये लपवून मद्य वाहतूक; अनमोड येथे कारवाई

जोयडा : गोवा-कर्नाटक सीमेवरील अनमोड तपासणी नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान ४६ हजार ७०० रुपयांचा १६७ लिटर (९२५ बाटल्या) अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. गुजरातमधील राजकोट येथील चालक योगेशभाई कागडाड याला अटक करण्यात आली आहे.

शनिवारी अबकारी विभागाचे कर्मचारी वाहन तपासणी करत असताना जी.जे. ०३ बी वाय ४५५९ क्रमांकाची अशोक लेलँड लॉरी संशयास्पदरीत्या येताना आढळली. तपासणी केली असता पुटमेस्टर कंपनीच्या काँक्रीट पंप व अॅक्सेसरीजमध्ये मद्याच्या बाटल्या लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या वाहनातून एकूण ९२५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

प्राथमिक तपासात संशयित गोवा राज्यातून गुजरातमध्ये विक्रीसाठी हा मद्यसाठा नेत असल्याचे समोर आले. अबकारी विभागाने वाहन, काँक्रीट मशीन व मद्यसाठा असा एकूण सुमारे ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासासाठी प्रकरण दांडेली विभागाच्या अंमलबजावणी उपनिरीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले असून संशयितास न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. 

हेही वाचा