उन्हाळी सुट्टी, इस्टरसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
31st March, 12:51 pm
उन्हाळी सुट्टी, इस्टरसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

​मडगाव : उन्हाळी सुट्ट्या आणि गुड फ्रायडे व इस्टर सणानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने (KRC) मडगाव ते बेंगळुरू आणि मडगाव ते मुंबई (Margao To Mumbai)  दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

 यशवंतपूर - मडगाव - बेंगळुरू कॅन्टोन्मेंट विशेष ट्रेन

​इस्टरच्या पार्श्वभूमीवर धावणारी ही गाडी गोवा (Goa) आणि कर्नाटक (karnataka)  दरम्यानच्या प्रवाशांसाठी सोयीची ठरेल. ​गाडी क्रमांक ०६२७१ यशवंतपूर ते मडगाव ही गाडी २ एप्रिल रोजी यशवंतपूर येथून रात्री २३.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता मडगावला पोहोचेल.

​गाडी क्रमांक ०६२७२ मडगाव ते बेंगळुरू कॅन्टोन्मेंट ही गाडी ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंटला पोहोचेल.  ही गाडी कुणिगल, हासन, सुब्रमण्य रोड, मंगळुरू (बंतवाला), उडुपी, कुंदापुरा, मुरुडेश्वर, कारवार आणि काणकोण यासह अन्य प्रमुख स्थानकांवर ही गाडी थांबेल.

 मुंबई सीएसएमटी - मडगाव - मुंबई सीएसएमटी ही साप्ताहिक विशेष

​उन्हाळी हंगामासाठी मुंबई आणि गोवा दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहे. ​गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई ते मडगाव ही ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवारी पहाटे ००.५५ वाजता ही गाडी मुंबई सीएसएमटीवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगावला पोहोचेल.

​गाडी क्रमांक ०१०२० मडगाव ते मुंबई ही ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवारी सायंकाळी १६.०० वाजता ही गाडी मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी येथे थांबेल.

गाडी क्रमांक ०६२७२ आणि ०१०२० साठीचे बुकिंग १ एप्रिलपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होईल. ​अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोकण रेल्वेचे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा