लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; कर्नाटकातील संशयिताला कोलवा पोलिसांकडून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; कर्नाटकातील संशयिताला कोलवा पोलिसांकडून अटक

मडगाव : लग्नाचे प्रलोभन दाखवून एका २६ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर कोलवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित सुभाष लमाणी (रा. कर्नाटक) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुभाष लमाणी याने पीडित युवतीशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून नोव्हेंबर २०२४ ते २२ मार्च २०२५ या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मात्र, कालांतराने संशयिताने पीडितेशी विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने कोलवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी विवाहाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल खाजनेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा