आदिवासी कल्याण खात्याच्या मातृत्व योजनेला स्कॉच पुरस्कार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29 mins ago
आदिवासी कल्याण खात्याच्या मातृत्व योजनेला स्कॉच पुरस्कार

पणजीः आदिवासी कल्याण खात्याच्या मातृत्व योजनेला स्कॉच (SKOCH) या संस्थेचा रौप्य पुरस्कार प्राप्त झाला. आदिवासी समाजातील ज्या जोडप्यांना मुले होत नाहीत त्यांना मोफत आयव्हीएफ (IVF) सुविधा या योजनेतून मिळते, अशी माहिती आदिवासी कल्याणमंत्री (Tribal welfare Minister)  रमेश तवडकर यांनी दिली. 

नवी दिल्ली (New Delhi)  इंडिया हॅबिट सेंटरात झालेल्या खास कार्यक्रमात हा पुरस्कार आदिवासी कल्याण खात्याला भेटवण्यात आला. आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगोडकर आणि गोवा राज्य आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्र‌ितिदास गांवकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. 

या विषयी अधिक माहिती देताना मंत्री तवडकर यांनी सांगितले की, २०१२ ते २०१७ दरम्यान आदिवासी कल्याण मंत्री असताना त्यांनी साधारण २२ ते २३ योजनांची अंमलबजावणी केली होती. त्यात मातृत्व योजनेचा समावेश आहे. 

समाजा मध्ये अशिक्षित लोकांच्या भावनेमुळे मुले नसलेल्या जोडप्यांमुळे अंधश्रद्धा तयार होऊन समाजामध्ये मोठी समस्या निर्माण होत होती. त्यासाठी समाजाला या दु:खापासून दिलासा देण्यासाठी मातृत्व आयव्हीएफ योजना जाहीर केली. या योजनेखाली वैद्यकीय उपचारासाठी ५ लाख रुपये एवढा लाभ मिळटो. आणि अशी योजना भारतभर कुठेच नाही, असे तवडकर यांनी सांगितले. 

या योजनेखाली एम्पेनेल्ड केलेल्या सात खाजगी इस्पीतळात आयव्हीएफ उपचार केले जातात. आणि हल्लीच गोवा वैद्कीय महाविद्यालयाच्या योजनेत समावेश केला आहे. आता पर्यंत या योजनेखाली ३५० जोडप्यांनी अर्ज केला. त्यातील ६० महिलांनी आयव्हीएफ पद्धतीनुसार ७२ मुलांना जल्म दिला आहे. त्यात १ तिळी  आणि १० जुळी मुले जन्माला आली आहेत, अशी माहिती तवडकर यांनी दिली. 

हेही वाचा