कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणी सोहम नाईकची कार जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणी सोहम नाईकची कार जप्त

पणजी : कुडचडे (Curchorem)  लैंगिक शोषण (Sex exploitation)  प्रकरणात वापरण्यात आलेली संशयित सोहम नाईक याची कार गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Branch) जप्त केली आहे. याप्रकरणात जप्त करण्यात आलेला त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सीक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. 

आता पर्यंत संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध पाच गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काल मंगळवारी एका १९ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संशयिताला न्यायालयात उपस्थित करून पोलीस कोठडी घेण्याच्या प्रयत्नात तपास अधिकारी आहेत. 

१९ वर्षीय युवतीने काल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयिताने मैत्री करून व लग्न करण्याच्या बहाण्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले व नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. जुलै २०२५ ते ९ मार्च २०२६ पर्यंत संबंध प्रस्थापित करण्यात आले. केपे तालुक्यातील एक धबधबा व इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

कार जप्त

दरम्यान, लैंगिक शोषण प्रकरणात वापरलेली संशयित सोहम नाईक याची कार गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केली. कारमध्ये काही पुरावे सापडण्याची शक्यता असल्याने त्याचा कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणात जप्त केलेला मोबाईल फोनही फॉरेन्सीक प्रयोग शाळेत (Forensic Lab)  तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग सखोल तपास करीत आहे. 

हेही वाचा