शिवोलीत सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला; आत्महत्येचा संशय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th March, 11:00 pm
शिवोलीत सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला; आत्महत्येचा संशय

म्हापसा : शिवोली येथे शनिवारी रात्री ३३ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला असून, ही आत्महत्या असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने एका व्यक्तीला मृत अवस्थेत रुग्णालयाच्या अपघात विभागात आणले असल्याचे पोलिसांना कळवले होते.

पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीची ओळख पुष्पेंद्र अशी पटली असून, तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवासी होता आणि सध्या शिवोली येथील ओशेल भागात वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह एका जुन्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पुष्पेंद्रची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या त्याच्या भावाला, एका लोखंडी नळीला चादरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह लटकलेला असल्याचे आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले.

चुलत भावाच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवला आणि त्याला तातडीने शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत अवस्थेत आणल्याचे सांगितले. त्यानंतर हणजूण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात जतन करून ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये या घटनेची ‘अनैसर्गिक मृत्यू’ म्हणून नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश हरिजन हे करीत आहेत. 

हेही वाचा