पक्ष्यांची नक्षी

Story: काव्यरंग |
14th March, 11:37 pm

​एकत्र आले सगळे पक्षी

त्याची तयार झाली सुंदर नक्षी

​एक पक्षी आला

कानात हळूच म्हणाला,

जागो भाई जागो

कोई तेरा नहीं है

सब चार दिन के है

तो हमेशा याद रखना

अकेलापन हमेशा तेरे साथ है

​दुसरा पक्षी आला

नि हळूच म्हणाला,

Success doesn't come to you

You go to it

But I Loss this word

& failed Life exam.

​तिसरा पक्षी आला आणि म्हणाला,

जीवन जग बेधुंद होऊन

सजव जीवन प्राण पणाला लावून

सफल ही स्वतःलाच हरवून

या जगातून जाताना जा

किर्ती मागे ठेवून!

​चौथा पक्षी आला नि म्हणाला,

उघड्या डोळ्याने वावरायचं आहे तुला

फसवेगिरीच्या जगात श्वास घ्यायचा आहे तुला

फसवेगिरीच्या मुखवट्यात वावरताना

आपलं माणूस शोधायचं आहे तुला!

​पाचवा पक्षी आला आणि म्हणाला,

या संदेशातून तुला

खूप काही शिकायचं आहे

काट्यातून दगडातून ठेचायचं आहे

मृत्यूशय्येवर असतानाही

इतरांच्या दुःखावर फुंकर घालायची आहे

​सहावा पक्षी आला आणि म्हणाला,

तेरी तो बात अलग है

तेरे मे कुछ खास है

चाहे सारी दुनिया तेरी शिकायत करे

पर हम हमेशा तेरे साथ है


अदिती मयेकर