अनारसे

Story: चमचमीत रविवार |
30th May, 11:20 pm
अनारसे

साहित्य: २ कप तांदूळ

१ कप किसलेला गूळ

१ बारीक वाटी खसखस

१–२ कप दूध

तळण्यासाठी तूप किंवा तेल

कृती: तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजत ठेवा. दररोज पाणी बदला. चौथ्या दिवशी तांदळातील पाणी निथळून सुक्या कापडावर पसरवा आणि थोडे वाळू द्या. मग मिक्सरमध्ये बारीक वाटून पीठ तयार करा. तयार केलेल्या पिठात गूळ आणि दूध घालून चांगले मळा. दुधाचा जरा जरा हात लावा, कारण मग गुळाचे पाणी सुटेल. हे पीठ साधारण ३ दिवस झाकून ठेवा, जेणेकरून त्याला फुग (आंबवण) यायला पाहिजे. फुग आल्यानंतर तुम्हाला अनारसे मऊ पाहिजे असल्यास १ केळे कुस्करून घाला.

आता या पिठाचे लहान लहान गोळे करून वरती थोडी खसखस लावून केळीच्या पानावर (पानाला थोडे तेल लावून) हाताच्या तळव्याने जाडसर असे अनारसे थापून घ्या. आता कढईत तूप किंवा तेल गरम करा (शक्यतो तूप घ्या). मध्यम आचेवर अनारसे सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तळताना खसखशीची बाजू वर ठेवून तळा.


संचिता केळकर