
पणजी: गोवा शालान्त मंडळाच्या बारावीच्या बोर्ड (Goa Board of Secondary and Higher Secondary) परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. कला, वाणिज्य (Commerce) आणि विज्ञान (Science) या विषयांचा पहिला पेपर आज घेण्यात आला. व्यावसायिक विभागाचा पहिला पेपर उद्या बुधवारी होणार आहे. परीक्षेसाठी १७,०८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
कला शाखेत एकूण ४१९९ आणि वाणिज्य शाखेत ५,००९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेत ५,४३६ आणि व्यावसायिक शाखेत २,४३८ विद्यार्थी आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा अंतिम पेपर २३ फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यानंतर तांत्रिक पेपर होतील.