शिक्षण खात्याकडून खास वैद्यकीय रजा धोरणाला मान्यता

पणजी : कर्करोग (Cancer), मूत्रपिंड (Kideny) निकामी होणे अशा प्रकारचे दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांना (Teachers) आता एक वर्षापर्यंत भर पगारी रजा मिळणार आहे. या रजेचा वेतन वा निवृत्ती नंतरच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारी वैद्यकीय मंडळ (Government Medical Council) व सरकारच्या मान्यतेनंतर एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी सुद्धा रजा मिळणे शक्य आहे.
याबाबतचा आदेश शिक्षण संचालक (Education Director) शैलेश जिंगडे यांनी जारी केला आहे. गोवा शालेय शिक्षण कायदा १९८४ द्वारे ही रजा मिळणार आहे. सरकारी व अनुदानित शाळा, विद्यालयातील शिक्षक या रजेसाठी पात्र आहेत.
या प्रकारच्या दुर्धर आजारांसाठी रजा मिळेल : लेटर स्टेज कॅन्सर
- अवयव निकामी होणे (मूत्रपिंड, यकृत, ह्रदय)
- अॅमीट्रोपिक लेटरल सीलेरोसीस (एएलएस)
- प्रोग्रेसीव न्युरोडीजनरेटिव डिसॉर्डस
हे आजार सरकारी वैद्यकीय यंत्रणांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
रजा घेण्यासाठी :
- शिक्षकाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे जोडून मुख्याध्यापकाकडे अर्ज देणे आवश्यक आहे.
- मुख्याध्यापकांनी तपासण्यासह मान्यतेसाठी शिक्षण संचालनालयाकडे सादर करावा
- आवश्यकता भासल्यास अर्ज सरकारी वैद्यकीय मंडळाकडे पाठविला जाईल
मुख्याध्यापकांनी पात्र शिक्षकांचे अर्ज विलंब न लावता पुढील सोपस्कारांसाठी त्वरीत पाठवून द्यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.