२६९ कोटी थकवणारे तीन कॅसिनो बंद; ५ कॅसिनोंनी सरकारचे थकवले ४५ कोटी

पणजी : सरकारी (Government) तिजोरीत कराच्या स्वरूपात महसुलाची भर पडावी म्हणून कॅसिनोंना (Casino) परवानगी देण्यात येत असली तरी सरकारला बऱ्याच कॅसिनोंनी आतापर्यंत चुना लावलेला आहे.
कॅसिनोंकडून कोट्यावधींची थकबाकी असताना देखील आता मांडवी नदीत (Mandovi River) मोठ्या कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपलब्ध माहिती नुसार कॅसिनोंनी सरकारला ३१४ कोटींचा चुना लावलेला आहे.
बंद पडलेल्या ३ कॅसिनोंकडून २६९ कोटींची थकबाकी आहे. सध्या सुरू असलेल्या ५ कॅसिनोंकडून ४५ कोटींची थकबाकी येणे बाकी आहे.
कॅसिनोंकडून भरभक्कम नोंदणी शुल्क तसेच वार्षिक शुल्काची आकारणी केली जाते. मात्र; हे शुल्क नियमित भरण्यापेक्षा ते थकवण्याचेच प्रकार सुरू आहेत.
बंद पडलेल्या ३ कॅसिनोंनी थकवले २६९ कोटी
- ला कॅलिप्सो हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या बंद असलेल्या कॅसिनोची थकबाकी १०७ कोटी ११ लाख (१०७१११८१७६ रूपये) आहे.
- बोगमाळो बीच रिसॉर्टवरील मे. ट्रेड विंगस कॅसिनोने ८२ कोटी ७० लाख (८२, ७०११४९५ रूपये) देणे आहे. १२ फेब्रुवारी २०१८ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतची ही थकबाकी आहे.
- नोवोटेल गोवा श्रेम रिसॉर्टवरील मे. एमकेएम ग्रँड गेमिंगची थकबाकी ८० कोटी (८०००००००० रूपये) एवढी आहे.
सुरू असलेल्या कॅसिनोंची थकबाकी
- मे. ब्रिटो अॅमुजमेंट (हॉटेल वायंगिणी वॅली) : २ कोटी ५० लाख
- मे. रॅफल्स स्कॅर डेवेलोपमेंट (द ओ हॉटेल) : ७ कोटी ५० लाख
- बीग बी लेजर (हॉटेल रियो रॉयल) : १४ कोटी
- मे. मॅचोस एंटरटेनमेंट (अॅवेन्यू ग्रॅंड हॉटेल कळंगुट) : १८ कोटी
- मे. गोल्डन ग्लोब हॉटेल्स (एम. व्ही. लकी सेवेन वेसल) : २ कोटी ७५ लाख