
पणजी : सासष्टी (Salcete) तालुक्यातील दवर्लीचे (Davorlim) माजी जिल्हा पंचायत सदस्य (Ex Zilla Panchayat Member) तथा नावेली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे (BJP) कार्यकर्ते परेश नाईक (५३ वर्षे) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वाढदिनीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अनमोड घाटातून प्रवास करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का आला.
परेश नाईक यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच भाजप नेत्यांनी पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यात सभापती गणेश गांवकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, क्रीडा मंत्री रमेश तवडकर व इतरांचा समावेश होता.
दरम्यान, त्यांच्या दु:खद निधनाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी शोक व्यक्त केला आहे.