
पणजी : मित्रांबरोबर गोव्यातील (Goa) हणजूण (Anjuna) येथे पार्टीला गेलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) विक्रम बी. या ३२ वर्षीय युवकाचा मोरजी (Morjim) येथे खोलीत मृत्यू झाला.
पोलिसांकडून (Goa Police) मिळालेल्या माहितीनुसार; युवक मित्रांबरोबर रात्री पार्टीला गेला होता. पार्टीवरून परतत असताना आपल्या छातीत दुखत असल्याचे व श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे आपल्या मित्रांना सांगितले. त्यांनी त्याला मोरजी येथील राहत्या खोलीवर आणले.
मात्र, याठिकाणी त्याची प्रकृती अधिक बिघडल्यावर शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृतावस्थेत आणल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सध्या, तरी घातपाताची शक्यता दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.