मिराबाग येथील बंधारा प्रकल्पाविरोधात आता धरणे आंदोलन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th February, 01:45 pm
मिराबाग येथील बंधारा प्रकल्पाविरोधात आता धरणे आंदोलन

सावर्डे : गोव्यातील (Goa) मिराबाग (Mirabag), सावर्डे (Sanvordem) येथे झुवारी नदीवर (Zuari River) बंधारा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक या प्रकल्पाविरोधात आंदोलन करीत आहेत. आज मंगळवारपासून स्थानिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. 

या परिसरात जलपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी झुवारी नदीवर बंधारा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, याठिकाणी बंधारा उभारल्यास पावसाळ्यात परिसर पाण्याखाली जाणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर या प्रकल्पाला गेल्या काही महिन्यांपासून विरोध सुरू केला होता.

गेले काही दिवस स्थानिकांनी या प्रकल्पाच्या आंदोलनाविरुद्धची धार वाढवली होती. मिराबाग व अन्य परिसरातील ग्रामस्थांनी ही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक बनले होते.

काल सोमवारी बंधारा प्रकल्पाचे काम हाती घेण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराला धारेवर धरले होते. ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर कंत्राटदाराने याठिकाणी असलेली मश‌िनरी हलवण्यास सुरूवात केली होती. आज मंगळवारी ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र झाले व धरणे आंदोलन सुरू केले. बंधारा प्रकल्प रद्द करीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. 


हेही वाचा