
वाळपई : गोव्यातील (Goa) पिसुर्ले, सत्तरी (Sattari) येथे ‘वाईन शॉप’च्या (Wine shop) शटरला आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी (Goa Police) दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यात मंझर फोक्रू बेग (राहणारा वाळपई, सत्तरी), कृष्णा पाटील (राहणारा वाळपई, सत्तरी) यांचा समावेश आहे. मंझर बेग याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.
यासंदर्भात भूषण वरक यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यात वरील दोघांनी संगनमताने तक्रारदाराच्या वाईन शॉपच्या शटरला आग लावून नुकसान केल्याचे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संस्थेच्या कलम ३२६ (जी), ३२४ (४) सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अन्य एकाचा शोध घेत आहेत.