थायलंड सरकारचा अजब निर्णय जगभरात चर्चेत; हत्तिणींचे करणार गर्भनिरोधक लसीकरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
42 mins ago
थायलंड सरकारचा अजब निर्णय जगभरात चर्चेत; हत्तिणींचे करणार गर्भनिरोधक लसीकरण

थायलंड:  जगभरात वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्भनिरोधक लसीकरण केले जाते. मात्र, थायलंड (Thailand)  सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची सध्या जगभरात चर्चा आहे. थायलंडात वाढत्या हत्तींची (Elephant) संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चक्क हत्तिणींचे गर्भनिरोधक लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

थायलंडमध्ये हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काही उपाय नसल्याने; गर्भनिरोधक लसीकरण करून ही संख्या नियंत्रणात आणणे शक्य आहे का; यासाठी थायलंड सरकारने प्रयत्न चालवले आहेत. वाढत्या संख्येमुळे थायलंडमध्ये हमरस्ते, रस्त्यांवर मोठ्या संख्येने हत्ती हैदोस घालत असतात. हत्ती व मानवामध्ये संघर्षही याठिकाणी सुरू असतो. एकूण ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हत्तींना गर्भनिरोधक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव अधिकारी यांनी‌ दिली. इतिहासात (History) पहिल्यांदाच हत्त‌िणींचे गर्भनिरोधक लसीकरण करण्यात येणार आहे. 

दरम्यान, वन्यजीव (Wildlife) संरक्षण कार्यालयाचे संचालक सुखी बूनसांग यांनी सांगितले की, पूर्व थायलंडमध्ये हत्तिणींचा जन्म दर अधिक असून, दरवर्षीचे प्रमाण जवळपास ८ टक्के आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३ टक्के जास्त आहे. 

हेही वाचा