
नवी दिल्ली : रेल्वे (Railway) भरती बोर्डाने (RRB) ग्रुप डी अंतर्गत २१,९९७ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन (Online) अर्ज करू शकतात.
अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ५ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत दुरुस्ती विंडो उपलब्ध असणार आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिसूचनेनुसार, एकदा रेल्वे झोन निवडल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता:
१०वी उत्तीर्ण
आयटीआय (ITI)
वयोमर्यादा:
किमान: १८ वर्षे
कमाल: ३३ वर्षे
निवड प्रक्रिया:
संगणक आधारित चाचणी (CBT)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट)
अर्ज शुल्क:
एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग (PwBD), महिला, ट्रान्सजेंडर, ईबीसी/अल्पसंख्याक: २५० रुपये
इतर सर्व उमेदवार:५०० रुपये
वेतन:
मूळ वेतन: १८,००० रुपये प्रति महिना
परीक्षेचा नमुना:
प्रश्नप्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
कालावधी: १.५ तास
विषय प्रश्नांची संख्या गुण
जनरल इंटेलिजन्स व रिझनिंग ३० ३०
जनरल सायन्स २५ २५
जनरल अवेअरनेस व चालू घडामोडी २० २०
गणित २५ २५
एकूण १०० १००
अर्ज कसा करावा:
अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in ला भेट द्या.
होमपेजवरील “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करा.
लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.