इराणमध्ये स्फोटांची मालिका : इमारती उद्धवस्त; १४ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
इराणमध्ये स्फोटांची मालिका : इमारती उद्धवस्त; १४ जणांचा मृत्यू

तेहरान : इराणमधील‌ (Iran) स्थिती दिवसेंदिवस कठीण बनत आहे. याठिकाणी सध्या बॉंबस्फोटांची (Bomb)  मालिका सुरू आहे. शनिवारी एका मागोमाग झालेल्या बॉंबस्फोटांत अनेक इमारती (Buildings) उद्धवस्त झाल्या तर १४ जणांचा मृत्यू झाला. 

दक्षिणेकडील प्रमुख बंदरगाह शहर (City) बंदर अब्बासमध्ये एका आठ मजली इमारतीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीचे खालचे दोन मजले उद्धवस्त झाले. स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. 

या स्फोटांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात चार मुलांचा समावेश आहे. सहा शहरांमध्ये आतापर्यंत स्फोटांचे फोटो समोर आले आहेत. जास्त स्फोट निवासी इमारतींमध्ये झाले, तर बंदर अब्बास बंदराला सर्वाधिक नुकसान झाले. त्यात अणुऊर्जा प्रकल्प असलेली तीन शहरांचा समावेश आहे. तावरिज, अहवाज व परांड येथेही स्फोट झाले. 

इराणच्या सरकारी टेलिव्हिजन चॅनेलनुसार, बंदर अब्बास शहरातील मोअलेम बुलेव्हार्डवर असलेल्या आठ मजली इमारतीत स्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात इमारतीचे दोन मजले पू्र्णपणे उद्धवस्त झाले. जवळ असलेली दुकाने, वाहने यांचेही नुकसान झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकू आले व त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. या स्फोटांवर इस्त्रायलने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, इस्त्रायल, अमेरिकेने यात काही केले नाही. 



हेही वाचा