इंदिरा नगर, चिंबल येथे मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त

घोगळ, हाऊसिंग बोर्ड येथील खूनप्रकरणानंतर पोलीस यंत्रणा सतर्क

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
18 mins ago
इंदिरा नगर, चिंबल येथे मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त

पणजी : गोव्यातील (Goa) घोगळ, हाऊसिंग बोर्ड, मडगाव (Housing Board, Margao) येथे मश‌िद  परिसरात दोन दिवसांमागे खूनप्रकरण घडल्यानंतर आता पोलीस यंत्रणा (Goa Police) सतर्क बनली आहे. इंदिरा नगर, चिंबल (Chimbel)  येथील मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हाऊसिंग बोर्ड येथे मशिदीसंदर्भातील एका मुद्यावरून झालेल्या वादातून वरील खून प्रकरण घडल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. याच वादातून तणाव निर्माण होऊन त्याचे पर्यावसन एकाचा खून करण्यात झाले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आता पोलीस यंत्रणा सतर्क बनली आहे. पोलिसांनी आता इंदिरा नगर, चिंबल येथे मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी ही एकूण स्थितीवर नजर ठेवून आहेत. खबरदारीची उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी चिंबल येथे पोलीस कुमक ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, घोगळ, हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील खूनप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 


हेही वाचा