अहो मंडळी आपण करवंटीतले खोबरं खुपकडे वापरतो आणि करवंटी बाहेर टाकतो. पण आजचा पदार्थ असा आहे की करवंटीचा पण वापर होता. काय असेल नक्की? चला तर बघुया.

साहित्य
• इडलीसाठी इडली बॅटर. २ कप (चांगलं फर्मेंट झालेलं)
• साजूक तूप २ चमचे.
• १ बारीक चिरलेला कांदा
• २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
• १ चमचा किसलेल आलं.
• कढीपत्ता ८–१० पाने.
• अर्धा चमचा लाल तिखट.
• १ बारीक चमचा धनेपूड
• १ बारीक चमचा गरम मसाला.
• चविनुसार मीठ.
• बारीक चिरलेली कोथिंबीर.
• चार स्वच्छ धुतलेल्या नारळाच्या करवंट्या.
कृती
गॅसवर कढईत तापत ठेवा.कढई तापली की साजूक तूप घाला. तुप गरम झालं की त्यात कांदा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यत परतून घ्या. आता यात हिरवी मिरच्या, आलं आणि कढीपत्याची पाने घालून वास येईपर्यंत परतून घ्या. आता लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून ३०–४० सेकंद परतून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
प्रत्येक करवंटीच्या तळाला १ ते २ चमचे तयार तूपचे मिश्रण मसाला लावा. आता त्या मसाल्यावर इडली बॅटर ओता. अर्धी करवंटी भरा. पूर्ण भरू नका. इडली फुलते. इडली पात्र/मोठ्या कुकरमध्ये पाणी उखळायला ठेवा. पाणी उखळलं की त्या करवंट्या ठेवून १२–१५ मिनिटं मध्यम गॅसवर शिजवा. सुरी/काडी घालून पाहा. स्वच्छ बाहेर आली तर इडली तयार. आता बाहेर काढा आणि वरून थोडंसं गरम साजूक तूप घाला. अश्या प्रकारे करवंटीतील घी मसाला इडली तयार आहे. नक्की करून पहा.

संचिता केळकर