
साहित्य:
२ मोठ्या वाट्या मटार
३ ते ४ लसणाच्या पाकळ्या
३ ते ४ आल्याचे तुकडे
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चमचा मिक्स हर्ब्स
१ बारीक चमचा चिली फ्लेक्स
२ बारीक वाट्या रवा
४ शिजवून घेतलेले बटाटे
तेल
पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:
एका मिक्सरच्या भांड्यात मटार आणि लसणाच्या पाकळ्या घाला आणि जाडसर वाटून घ्या. बारीक पेस्ट करू नका. आता गॅसवर कढई तापत ठेवा. कढई तापली की त्यात तीन ते चार चमचे तेल तापत ठेवा. तेल तापले की बारीक चिरलेले कांदे घाला. कांदा जरा शिजला की त्यात वाटलेले मटार, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स घाला आणि मटार शिजेपर्यंत परतून घ्या. आता यात २ कप पाणी आणि रवा घाला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थोडे थोडे पाणी घाला. घट्ट असे पीठ करा. आता वरून कोथिंबीर आणि कुस्करलेले बटाटे घाला व हाताच्या तळव्याने छान मळून घ्या. हाताला तेल लावून लहान लहान गोळे घेऊन तुमच्या आवडीनुसार आकार द्या. आता हे नागेट्स तेलामध्ये कुरकुरीत तळा.

संचिता केळकर