चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली

केरये-खांडेपार येथील अपघातात ४ जण जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
40 mins ago
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली

फोंडा : केरये-खांडेपार येथे गुरुवारी संध्याकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. अपघातात कारमधील ४ जण जखमी झाले. जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

बुधवारी रात्रीपासून अपघाताची मालिका फोंडा पोलीस स्थनकाच्या हद्दीत सुरूच होती. गुरुवारी संध्याकाळी कार रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात मधू सालेलकर (तळावली), तुषार परवार (धारबांदोडा), नवलू कोलापटे (कवळे) आणि विष्णू नाईक (कवळे) हे चार जण जखमी झाले. अपघातानंतर काहीवेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी त्वरित अपघातस्थळावर जाऊन स्थिती नियंत्रणात ठेवली.

दरम्यान, तिस्क- उसगाव येथे बुधवारी रात्री कारची धडक मागाहून दुचाकीला बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. तसेच मापा - पंचवाडी येथे बुधवारी रात्री कार रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला. 

हेही वाचा