इनवर्टरचे दुरुस्ती काम करताना दुर्दैवी घटना

पेडणे : पालये पेडणे येथील स्वप्नेश परब (३९) या युवकाला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. इनवर्टरचे दुरुस्ती काम करताना ही घटना घडली. त्यामुळे पालये परिसरात शोककळा पसरली आहे.
स्वप्नेश परब हे सरकारी रुग्णालयात मुख्य ब्रदर म्हणून कार्यरत होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना दोन लहान मुले आहेत. ते आपल्या घरी एसी दुरुस्तीचे काम करत असताना इनवर्टरचा रिव्हर्स करंट लागल्यामुळे ही घटना घडली.