सतीश नार्वेकर उत्कृष्ट दिग्दर्शक : सियावर राम, गिमोणेचे ‘डेथ अँड द मेडन’ नाटक द्वितीय

पणजी : कला अकादमी गोवाच्या (Kala Academy Goa) १८व्या अ गट मराठी नाट्यस्पर्धेत रुद्रेश्वर पणजी (Rudreshwar Panaji) संस्थेच्या ‘द लास्ट सेल’ या नाटकाने १ लाखाचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. द्वितीय ७५ हजारांचे पारितोषिक सियावर राम, गिमोणे-डिचोलीच्या ‘डेथ अँड द मेडन’ या नाटकाला, तर तृतीय ५० हजारांचे पारितोषिक सिद्धिविनायक क्रिएशन, सांत इनेज -पणजी यांच्या ‘दाह’ या नाटकाला प्रदान करण्यात आले. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे संस्थेच्या ‘कार्मेलीन’ आणि श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सतरी संस्थेच्या ‘सिरी सपिगे’ या दोन्ही नाटकांनी २५ हजारांची उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली आहेत.

सतीश नार्वेकर
दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक गंगाराम (सतीश) नार्वेकर (Satish Narvekar) : नाटक ‘द लास्ट सेल’ (रुद्रेश्वर, पणजी), द्वितीय पारितोषिक वैभव गोविंद कवळेकर : नाटक ‘डेथ अँड द मॅडन’ (सियावर राम, गिमोणे-डिचोली), तृतीय पारितोषिक संतोष शेटकर नाटक ‘दाह’ (सिद्धिविनायक क्रिएशन, सांतिनेज-पणजी) यांना प्राप्त झाली.

दीपक आमोणकर
वैयक्तिक अभिनय (पुरुष) प्रथम पारितोषिक प्रा. दीपक आमोणकर (विली) यांना ‘द लास्ट सेल’साठी, तर द्वितीय पारितोषिक रामकृष्ण उर्फ साई गंगाराम कलंगुटकर (सदू )यांना ‘बेट’ या नाटकासाठी मिळाले. सचिन चौगुले (रॉबर्टो मिरांडा) डेथ अॅन्ड द मेडन, अमोघ प्रसाद बुडकुले (जुझे, आग्नेल, रुजार, निसार) कार्मेलीन, मन्मेश नाईक (कालिंगा) सिरी संपिगे, सौरभ कारखानीस (रघुवीर) खिडकी, अश्वेक देसाई (बिफ) द लास्ट सेल यांना अभिनय (पुरुष) गटात प्रमाणपत्रे मिळाली.

स्नेहल गुरव
वैयक्तिक अभिनय (स्त्री) प्रथम पारितोषिक स्नेहल गुरव (पाऊलीना सालास) यांना ‘दाह’साठी, द्वितीय पारितोषिक वैष्णवी पै काकोडे यांना ‘कार्मेलीन’साठी प्रदान करण्यात आले. चैती कडकडे (पॉलिना) डेथ अॅन्ड द मेडन, मनुजा लोकूर-नार्वेकर (लिंडा) द लास्ट सेल, कृतिका जाण (बेलिंदा) कार्मेलीन, डॉ. वेदिका वाळके (सिरी संपिगे) सिरी संपिगे, उर्वी रानडे केळकर (सोनुली) खिडकी यांना अभिनय (स्त्री) गटात प्रमाणपत्र मिळाले.
तसेच नेपथ्य प्रथम वैभव कळंगुटकर (डेथ अॅन्ड द मेडन) सियावर राम, गिमोणे-डिचोली आणि प्रमाणपत्र युवराज साखळकर (द लास्ट सेल) रुद्रेश्वर, पणजी यांना मिळाले आहे.
प्रकाशयोजना नीलेश महाले (खिडकी) रसरंग, उगवे, प्रमाणपत्र वैभव नाईक (सिरी संपिगे) श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी.
वेशभूषा : वैष्णवी पै काकोडे (कार्मेलीन) श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटयसमाज, बांदिवडे-फोंडा, प्रमाणपत्र मैथिली प्रदीप शिरोडकर (मशालीच्या अंधारात) मांगिरीश युथ क्लब, मंगेशी-फोंडा.
ध्वनीसंकलन/पार्श्वसंगीत : प्रथमेश उसपकर (देवा म्हाराजा) नटरंग किएशन्स, नार्वे-डिचोली, प्रमाणपत्र केदार मेस्त्री (सिरी संपिगे) श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी.
रंगभूषा : सुयश सुर्लकर (देवा म्हाराजा) नटरंग किएशन्स, नार्वे-डिचोली, प्रमाणपत्र प्रदीप गोवेकर (मशालीच्या अंधारात) मांगिरीश युथ क्लब, मंगेशी-फोंडा.
सीताराम रेडकर यांना लेखनाचे प्रथम पारितोषिक
नाट्यलेखन प्रथम पारितोषिक : अॅड. सीताराम महाबळेश्वर रेडकर (बेट) नटरंग कला सांस्कृतिक मंडळ, वझरी-पेडणे. द्वितीय पारितोषिक : अंतरा भिडे (मशालीच्या अंधारात) मांगिरीश युथ क्लब, मंगेशी-फोंडा आणि खास स्पर्धेसाठी अनुवादित/रुपांतरित केलेल्या संहितेसाठी पारितोषिक अश्वेक देसाई (द लास्ट सेल) रुद्रेश्वर, पणजी यांना देण्यात आले आहे.