लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करणाऱ्या वाराणसीच्या युवकाला अटक

गोवा पोलिसांच्या सायबर विभागाची साळगाव येथे कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 mins ago
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करणाऱ्या वाराणसीच्या युवकाला अटक

पणजी : अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफीत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पाहणे एका युवकाला बरेच महागात पडले आहे. या प्रकरणी सायबर विभागाने साळगाव येथून शिवम श्रीवास्तव (२८, वाराणसी उत्तर प्रदेश) या युवकाला अटक केली आहे.

अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण करणारी सामग्री पाहणे, एकमेकांना पाठवणे किंवा प्रसारित करणे यावर जगभरात बंदी आहे. असे असतानाही गोव्यातून असे साहित्य डाऊनलोड केल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सायबर विभागाला मिळाली होती. त्यानुसार, २६ आॅक्टोबर २०२५ रोजी एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक, ईमेल आणि इन्स्टाग्राम आयडीवरून अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफीत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पाहत असल्याची माहिती मिळाली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संबंधित व्यक्ती साळगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली काॅन्स्टेबल ईब्राहीम करोल आणि आशिष नाईक या पथकाने साळगाव परिसरात शिवम श्रीवास्तव (२८, वाराणसी उत्तर प्रदेश) या युवकाच्या मुसक्या आवळून कारवाई केली. 

हेही वाचा