
मडगाव : आके मडगाव परिसरात संमोहित करून दुकानदाराचे दीड हजार रुपये चोरल्याचा दावा करत नागरिकांनी दोघा संशयितांना मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. मडगाव पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
आके परिसरात बुधवारी सकाळी भीक मागणार्या दोघाजणांना नागरिकांनी पकडले. त्या दोघांनी पैसे देणार्या दुकानदारालाच संमोहित करून त्याच्याकडील दीड हजार रुपये पळवल्याचे उपस्थितांनी सांगितले. नागरिकांनी दोघांना पकडून ठेवत मडगाव पोलिसांना बोलावले. मडगाव पोलिसांनी दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.