आरिफ कराडी ‘स्ट्रॉन्गेस्ट मॅन’, राजश्री पेडणेकर ‘स्ट्रॉन्गेस्ट वुमन’

पणजी : गोवा विद्यापीठाच्या वतीने सिल्व्हर जुबिली हॉल, गोवा विद्यापीठ संकुलात आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५–२६ मध्ये गोव्यातील विविध महाविद्यालयांच्या खेळाडूंनी आपल्या ताकद, तंत्र आणि जिद्दीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या आणि अनेक खेळाडूंनी वैयक्तिक तसेच सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुष गटात केपे व मडगाव संयुक्त विजेते ठरले, तर महिला गटात व्ही.एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ, मिरामारने विजेतेपद पटकावले.
आंतरमहाविद्यालयीन पुरुष पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, केपे आणि पार्वतीबाई चौगुले कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मडगाव
या दोन महाविद्यालयांनी संयुक्तपणे विजेतेपद पटकावले. पाद्री कॉन्सेईकाओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेर्णा यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
फादर अॅग्नेल कॉलेज, पिलार येथील आरिफ कराडी याने उत्कृष्ट कामगिरी करत
‘स्ट्रॉन्गेस्ट मॅन २०२५–२६’ हा मानाचा किताब पटकावला.
महिला गटात मिरामारचे वर्चस्व
आंतरमहाविद्यालयीन महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत व्ही.एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ, मिरामार या संघाने विजेतेपद पटकावले. पार्वतीबाई चोगुले कॉलेज, मडगाव आणि डॉन बॉस्को कॉलेज, पणजी यांनी संयुक्तपणे उपविजेतेपद मिळवले.
एस.एस. धेम्पो कॉलेज, कुजिरा-बांबोळी येथील राजश्री पेडणेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘स्ट्रॉन्गेस्ट वुमन २०२५–२६’ हा किताब पटकावला. या स्पर्धेत तीन नवे विक्रम नोंदवले गेले
५७ किलोपर्यंत गटात राजश्री पेडणेकर (३०७.५ किलो), ८४ किलोपर्यंत गटात साक्षी हळदणकर (३४२.५ किलो), ८४ किलोपेक्षा अधिक गटात इराम खत्री (३७० किलो) यांनी विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभाला गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. सुंदर धुरी, डॉ. के. एस. राव, डॉ. मनोज हेदे आणि सहाय्यक क्रीडा संचालक बालचंद्र जादर हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आले.
महिला गट : वजनगटनिहाय विजेते
४७ किलोपर्यंत – पुष्पा विश्वकर्मा (डॉन बॉस्को, पणजी)
५२ किलोपर्यंत – खुशी नांबियार (श्री दामोदर कॉलेज)
५७ किलोपर्यंत – राजश्री पेडणेकर (एस.एस. धेम्पो कॉलेज)
६३ किलोपर्यंत – सिया नाईक (पी.ई.एस. फार्मसी)
६९ किलोपर्यंत – तिशेया फर्नांडिस (पार्वतीबाई चोगुले कॉलेज)
७६ किलोपर्यंत – दुर्वा साळगावकर (विद्या प्रबोधिनी)
८४ किलोपर्यंत – साक्षी हळदणकर (व्ही.एम. साळगावकर लॉ कॉलेज)
८४ किलोपेक्षा अधिक – इराम खत्री (व्ही.एम. साळगावकर लॉ कॉलेज)
पुरुष गटातील वजनगटनिहाय विजेते
५९ किलोपर्यंत – जीजस जोसेफ (गव्हर्नमेंट कॉलेज, केपे)
६६ किलोपर्यंत – आरिफ कराडी (फादर अॅग्नेल कॉलेज)
७४ किलोपर्यंत – देवेश गावकर (गव्हर्नमेंट कॉलेज, केपे)
८३ किलोपर्यंत – रिसबर्न फर्नांडिस (पी.सी.सी.ई., वेर्णा)
९३ किलोपर्यंत – मार्क सोजा (व्ही.एम. साळगावकर लॉ कॉलेज)
१०५ किलोपर्यंत – अॅस्टल डिसोझा (जी.आर. कारे लॉ कॉलेज)
१२० किलोपर्यंत – पुष्पराज नाईक (पार्वतीबाई चौगुले कॉलेज)
१२० किलोपेक्षा अधिक – मेलिसन रीव्ह्स (पार्वतीबाई चोगुले कॉलेज)