सीबीआय चौकशीशिवाय माघार नाही! बर्च दुर्घटनेवरून विरोधक आक्रमक

मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीची ग्वाही.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
सीबीआय चौकशीशिवाय माघार नाही! बर्च दुर्घटनेवरून विरोधक आक्रमक

पणजीः विधानसभा अधिवेशनाचा (Assembly session) शेवटचा दिवस बर्च दुर्घटनेवरून (Birch fire incident)  बराच गाजला. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief  Minister Dr. Pramod Sawant) यांच्याकडून ठोस उत्तरे आणि आश्वसाने मिळत नसल्याचा आरोप करीत विरोधी आमदारांनी सभापतीच्या हौदात धाव घेऊन न‌िषेध केला. याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी व मंत्री, आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. या क्लबसंदर्भात पूर्ण चौकशी करणार असून, क्लब सुरू करण्यासाठी प्रथम परवानगी कुणी दिली; त्याची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

बर्च प्रश्नावरून विरोधक हातात फलक घेवून गोंधळ घालत प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत सभागृहात मांडी घालून बसले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले. 

बर्च दुघटनेविषयी पुढे ढकळलेला प्रश्न शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चर्चेला आला. सरकारने अधिकाऱ्यांवर कारवाई केली पण  दुर्घटनेविषयी राजकीय जबाबदारी निश्चित करून आमदार व मंत्र्यावर सुद्धा कारवाई करावी. तसेच या प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षेनेत युरी आलेमाव यांनी केली.  

यात कुणाचीच राजकीय जबाबदारी नाही. या प्रकरणात जर कुणी गुंतलेला असेल तर त्याच्याावर जबाबदारी निश्चित होणार. तसेच हा क्लब प्रथम सुरू कोणी केला; तेथे कोणी प्रथम बांधकाम सुरू केले, त्याला परवानगी कोणी दिल्या हे सर्व दंडाधिकारी चौकशी घालतो; असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बर्च दुर्घटनेनंतर राज्यात ८६ आस्थापनांची तपासणी करून त्यातल्या २२ आस्थापनांना कसलेच आवश्यक दाखले आणि परवाने नसल्याचे दिसून आल्यावर सील केले असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बर्च दुर्घटनेत नेमलेल्या दं‌डाधिकारी चौकशीचा अहवाल कशाला लपवून ठेवतात. या अहवालात मंत्र्याचे नाव आहे म्हणून तो लपवून ठेवला आहे. मुख्यमंत्र्यानी हा अहवाल सभागृहात सादर करावा; अशी मागणी बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केली. 

बर्च दुर्घटनेचा दंडाधिकारी चौकशी अहवाल सर्वांवर आरोप निश्च‌ित झाल्यावर पुढील विधानसभा सत्रात सभागृहात मांडणार, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, मुख्यमंत्र्याच्या उत्तर आणि आश्वासनावर समाधानी नसल्याचे सांगत विरोधी आमदारांनी हातात फलक घेवून सभापतीच्या हौदात धाव घेत निषेध सुरू केला. पण सभापतीने सभागृहाचे कामकाज सुरू ठेवून पुढील प्रश्न विचारल्यावर आमदार विजय सरदेसाई आपल्या जागेवर गेले आणि आपला प्रश्न मांडला. प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत विरोधी आमदार जमिनीवर मांडी घालून बसले होते आणि शु्न्य प्रहर सुरू झाल्यावर ते आपल्या जागेवर येऊन बसले.  

हेही वाचा