बाणावली, कोलवातील चार रेस्टॉरंट सील

विनापरवाना व्यवसायावर जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 mins ago
बाणावली, कोलवातील चार रेस्टॉरंट सील

मडगाव : ‍‍‍दक्षिण गोव्यातील बाणावली आणि कोलवा किनारपट्टी भागात विनापरवाना चालणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गुरुवारी सकाळी केलेल्या कारवाईत बाणावलीतील ‘युवर स्टोरी’ या रेस्टॉरंटसह कोलवातील ‘फिशलँड’, ‘गॅलेरिया’ व ‘एम बीच रिसॉर्ट’ ही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स सील करण्यात आली.


जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये किनारी भागात अनेक रेस्टॉरंटकडे व्यापार परवाना, अग्निशामक दलाचे परवाने तसेच प्रदूषण व इतर खात्यांकडून आवश्यक परवाने नसल्याचे दिसून आले होते. अधिकारी रोहित कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जोपर्यंत सर्व कायदेशीर परवानग्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत ही रेस्टॉरंट्स बंदच राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, यानंतर जिल्हा प्रशासनाकडून स्थापन केलेल्या इतर समितींकडून कोलवातील फिशलँड, गॅलेरिया व एम बीच रिसॉर्ट या रेस्टॉरंटवरही कारवाई करत ही आस्थापने सील करण्यात आली.