
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) महानगरपालिका निवडणुकीसाठी (Muncipal Corporation) सध्या मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे (Election) निकाल भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला अनुकूल दर्शवत आहेत. सकाळी ११.५० वाजण्याच्या सुरवातीच्या कलांनुसार, भाजप ५३५ प्रभागांमध्ये आघाडीवर तर मित्रपक्ष शिवसेना १७० प्रभागांमध्ये आघाडीवर आहे.
मुंबईवर सर्वांचे लक्ष लागून आहे ते एकत्र निवडणूक लढवलेल्या ठाकरे बंधूंवर. बृहन्मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) भाजपच्या नेतृत्त्वाखालील युती ६२ प्रभागांमध्ये आघाडीवर आहे तर उद्धव व राज ठाकरे एकत्रितपणे ३९ प्रभागांमध्ये पुढे आहेत. नवी मुंबईत १११ पैकी २८ प्रभागांमध्ये भाजप आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, शिवसेना २७ प्रभागांमध्ये आघाडीसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत २२७ पैकी ४३ प्रभागांमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १७ प्रभागांमध्ये आघाडीवर आहे. उद्धव व राज ठाकरे एकत्रितपणे ३५ प्रभागांमध्ये पुढे आहेत. शिवसेना कार्यकत्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. निकाल जसे जाहीर होणार तशी चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.