आदिवासी समाजातील शंकर भिल यांना पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठाची ७५ लाखांची स्कॉलरशिप

शुन्यातून गगनभरारी घेतलेल्या युवकाचे सर्व थरातून कौतुक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
25 mins ago
आदिवासी समाजातील शंकर भिल यांना पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठाची ७५ लाखांची स्कॉलरशिप

जळगाव : एकदम हलाखीच्या परिस्थितीतीवर मात करीत शिक्षण (Eductaion) घेत पीएचडी (PhD) करण्यासाठी अमेरिकेतील (America) विद्यापीठाची (University) ७५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती ( स्कॉलरशिप) (Scholarship) मिळवलेल्या शंकर अरुण भिल या युवकाचे सध्या  कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra)  नाग‌झिरी, जळगाव येथील ग्रामीण भागात जन्मलेल्या या युवकाने  कठीण परिस्थितीवर मात करीत शु्न्यातून गगनभरारी घेतली. आणि संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवली. 

‘आद‌िवास‌िंच्या जमिनी बिगर आदिवासियांकडे कशा गेल्या’? हा त्यांचा पीएचडीतील संशोधनाचा विषय असून, त्यावर सखोल संशोधन करून विद्यापीठात पेपर सादर करणार आहे. आपल्या या उल्लेखनीय यशाबद्दल माहिती देताना शंकर भिल यांनी सांतिले की, जळगाव येथील नागझिरी या ग्रामीण भागात आपला जन्म झाला. २० ते २५ घरे व ८० ते १०० लोकांची वस्ती. गावातील बहुतेक लोक मजुरी करणारे, विट भट्टीवर व इतर कष्टांची कामे करून उदरनिर्वाह करणारे. गावात आपला भाऊ धरून केवळ ४ जण बारावी उत्तीर्ण आहेत. केवळ आपणच उच्च शिक्षण घेतले आहे.

पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठाची आपल्याला डॉलरच्या रुपात आर्थिक सहाय्य मिळाले आहे. भारतीय चलनात ते ७० ते ७५ लाख रुपये होतात. आपली घरची परिस्थिती एकदम बिकट होती. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घराची दुर्दशा झाली. आईलाही खूप त्रास व कष्ट सहन करावे लागले. दारूच्या व्यसनात आपण अकरावीत असताना वडिलांचे निधन झाले. मात्र, आईने काबाडकष्ट करून, मजुरी करून आपल्याला, भावाला वाढवले व शिक्षण दिले. आईच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो; असे शंकर यांनी सांगितले. पीएचडी पूर्ण करून आपल्या आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी  कार्य करण्याचे, या समाजाच्या व्यथा मांडण्याचे आपले ध्येय आहे.

कष्टांचे चीज झाले : आई सिंधु 

आई सिंधु यांनी सांगितले की, आपल्या मुलाने एकदम हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत उच्च शिक्षण घेतले आहे. अमेरिकेतील विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याने आनंद आहे. उपसलेल्या कष्टांचे चीज झाले. मात्र, मुलगा आपल्यापासून दूर अमेरिकेत जाणार हे ऐकून दु:ख वाटत आहे. एकूण शंकर यांचे हे यश कठीण परिस्थितीवर मात करीत शुन्यातून गगनभरारी घेऊ इच्छित असलेल्यांना प्रेरणादायी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘इच्छा तेथे मार्ग’.   

हेही वाचा