शेकडोंच्या संख्येने आंदोलक अटल सेतूनजीक एकवटले

पणजी: चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. आज सकाळी शेकडो आंदोलक अटल सेतूजवळ एकत्र आले असून, तेथून विधानसभेच्या दिशेने महामोर्चाला प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत काल झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी आज थेट विधानसभेवर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मांडवी पुलावर आणि विधानसभा संकुलाच्या परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आमचा नैसर्गिक वारसा असलेल्या तोयार तलावाच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, पण मॉल होऊ देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
बातमी अपडेट होत आहे.