गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशन : दिवस चौथा | LIVE

युनिटी मॉलविरोधात चिंबलकर आक्रमक! विधानसभेवर धडकणार मोर्चा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशन : दिवस चौथा | LIVE

पणजी : गोव्याच्या ८ व्या विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून वादळी वातावरणात सुरू झाले असून, आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या सत्रात २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रोज सकाळी ११:३० वाजता कामकाजाला सुरुवात होणार असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत.



चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' प्रकल्पावरून सध्या रान पेटले आहे. काल मुख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आज सकाळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेवर मोर्चा काढला आहे.



आज सकाळी १०:३० वाजल्यापासून चिंबल आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक अटल सेतूजवळ जमा झाले. गोविंद शिरोडकर आणि इतरांनी जमलेल्या लोकांना संबोधित केले. कालच  जिल्हा न्यायालयाने मॉलचा बांधकाम परवाना रद्द केल्यामुळे आंदोलकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जेव्हा न्यायालय आमची बाजू मान्य करते, तेव्हा सरकार हट्ट का धरत आहे? असा सवाल आंदोलक करत आहेत.



दरम्यान मांडवी पुलावर आणि विधानसभा संकुलाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी जलद प्रतिसाद पथक (QRT) आणि अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. 



LIVE UPDATES 🛑




१२:०२ | काँग्रेसने मोठ्या प्रमाणात भू-रूपांतरण करून गोव्याची वाट लावली. आम्ही एल्टन डिकॉस्टांना सांभाळून घेऊ; विजय सरदेसाईंनी आमच्यासोबत यावे : विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री. 


११: ३९ | सत्र न्यायालयाचा आदेश वाचला असून चिंबलच्या आंदोलकांनी चर्चा करावी. या निर्णयाला आव्हान देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊ नये, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.


११. २५ | आंदोलनाला ‘जॅमर’? 

युनिटी मॉलच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे 'लाईव्ह कव्हरेज' गोवा पोलिसांनी सिग्नल जॅमरद्वारे बंद पाडले. पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारल्यानंतर जॅमर हटवले.

हेही वाचा