
काणकोण : काणकोणमधील (Canacona) मुठाळ, सादोळशे येथे आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात आग लागून होरपळलेले बासिलिओ कुतिन्हो यांचे मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात (South Goa District Hospital, Margao) उपचार सुरू असताना निधन झाले. आगीत होरपळल्यानंतर काल बुधवारी त्यांना काणकोणहून मडगावातील जिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक घरातील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली होती. आगीत होरपळले होते. घरात एकटेच होते. घरातून धूर येत असल्याचे पाहून स्थानिकांनी घरात धाव घेऊन पाहिले असता; ते आगीत होरपळले होते. त्यानंतर त्यांना इस्पीतळात दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात काणकोण पोलीस अधिक तपास करीत आहेत.