बर्च दुर्घटना चौकशी अहवाल सरकार का उघडत नाही? : वेंझी व्हिएगस

फेर्दिन रिबेलो यांच्या मागण्यांचा उल्लेख अभिभाषणात हवा होता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
बर्च दुर्घटना चौकशी अहवाल सरकार का उघडत नाही? : वेंझी व्हिएगस

पणजी : बर्च क्लबला आग (Birch Club Fire) लागून २५ जण ठार झाले. या दुर्घटनेच्या चौकशी अहवालाचा (Investigation report) अभिभाषणात उल्लेख नाही. हा अहवाल सरकार उघडत नाही, वा त्यावर सभागृहात चर्चा सुध्दा का करत नाही? असा प्रश्न आमदार वेंझी व्हिएगस यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या (Governor) अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. 

गोवा (Goa) वाचवण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी मागण्यांचे निवेदन सरकारला दिले आहे. या विषयी सुद्धा अभिभाषणात उल्लेख नाही, असे सांगत आमदार वेंझी व्हिएगस यांनी अभिभाषणावर टिका केली. विकसित गोवा करण्याचे उद्द‌िष्ट असले तरी ते कसे करणार; या विषयी कसलाच उल्लेख अभिभाषणात नाही. नगरनियोजन कायद्याच्या कलम १७ (२) आणि ३९ (ए)च्या आधारे शेती तसेच जमिनीचे रूपांतरण सुरूच आहे. आग लागलेला बर्च बाय रोमीओ लेन हा क्लब सुद्धा बेकायदा जमीन रूपांतरण करून बांधल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  जमिनीच्या रूपांतरणाविषयी कसलाच उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात नाही. राज्यात नोकर्‍यांसाठी पैसे देणारे जॉब स्कॅक उजेडात आले. कर्मचारी भरती आयोगामार्फत होते; त्या भरतीचे सर्वजण कौतुक करीत असतले तरी तरुणांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकार काय करते? ते राज्यपालांनी अभिभाषणात सांगितले नाही. 


हेही वाचा