दक्षिण गोव्यात १८ जानेवारीला वीज खंड‌ित; पाणी पुरवठ्यावरही परिणाम

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
34 mins ago
दक्षिण गोव्यात १८ जानेवारीला वीज खंड‌ित; पाणी पुरवठ्यावरही परिणाम

मडगाव : वीज खात्यातर्फे (Electricity Department)  दक्षिण गोव्यात (South Goa) १८ जानेवारी रोजी वार्षिक शटडाउन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सासष्टी, काणकोण, सांगे, केपे या तालुक्यांसह धारबांदोडा व फोंडा तालुक्यातील काही भागावर परिणाम होणार आहे. साळावली जलप्रकल्पालाही वीज पुरवठा होणार नसल्याने पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. 

  वीज खात्याकडून वार्षिक शटडाउन जाहीर करण्यात आलेले आहे. १८ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीज खंडित राहणार आहे. या कालावधीत शेल्डे व कुंकळ्ळी येथील २२० केव्ही ईएचव्ही सबस्टेशन यासह २२० केव्ही इंटरस्टेट व इंट्रास्टेट वीजवाहिन्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सासष्टी, काणकोण, सांगे, केपे या तालुक्यांसह धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ पंचायत परिसर, शिगाव, कुळे, मोले, फोंडा तालुक्यातील पंचवाडी पंचायत परिसर येथे वीज खंडित राहील. या कालावधीत राय, कुडतरी, लोटली, माकाझन, वेर्णा, माजोर्डा व मुरगाव तालुक्यातील वीज पुरवठा सुरू राहणार आहे.

 याशिवाय शेळपे येथील साळावली जल प्रकल्पाला होणारा वीज पुरवठाही खंडित राहणार असल्याची माहिती वीज खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे साळावली जल प्रकल्पातून होणार्‍या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.

हेही वाचा